भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा अधिकृतपणे डब्ल्यूटीए महिला दुहेरी रँकिंगच्या अव्वल स्थानावर विराजमान झाली. हे स्थान पटकावणारी ती पहिली महिला भारतीय टेनिसपटू ठरली आहे. तिच्या अग्रमानांकनावर महिला टेनिसची सर्वोच्च संघटना असलेल्या डब्ल्यूटीएने आता अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले आहे. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकाविणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे. सानियाच्या आधी १९९० च्या दशकात लियांडर पेस आणि महेश भूपती या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीचे अव्वल स्थान पटकाविले होते.
No comments:
Post a Comment